सोमेश्वरनगर : वाणेवाडी( ता बारामती) येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग या संस्थेच्या वतीने विविध बेल्टसाठी कराटे स्पर्धा नुकत्याच वाणेवाडीतील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या प्रांगणात पार पडल्या या स्पर्धेत ब्राऊन बेल्ट फर्स्ट सियोन गायकवाड व सार्थक सकाटे त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश रासकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे:
स्वरा फडतरे ,वैभवी भोसले ,जुई भोसले ,ओवी काकडे ,शुभ्रा काकडे ,समृद्धी कारंडे , खुशी आतार, विराज मोठे ,वरदराज निलाखे ,शारोन गायकवाड, श्रीनाथ भोसले ,रुद्रवीर जगताप, श्रेयाश जाधव ,अभिनंदन धायगुडे या सर्व मुलांचा पारितोषिक
देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेचे ब्लॅक बेल्ट मास्टर श्रीअंश खैरनार बबन मोठे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.