सोमेश्वरनगर परिसरात गुलाबी थंडी आणि दाट धुके
सोमेश्वरनगर - मनमोहक असे वातावरण सोमेश्वरनगरकरांनी शनिवारी अनुभवले. वातावरणात गारवा वाढल्यामुळे थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या. अजूनही सकाळीचे धुक्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही.
सोमेश्वरनगर येथील गावांमध्ये थंडीची तीव्रता वाढत आहे.
शनिवारी सोमेश्वरनगर परिसरातील नागरिकांनी गुलाबी थंडीसोबतच दाट धुके व दवबिंदू अशा मनमोहक वातावरणाचा अनुभव तर सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती. पहाटेपासूनच परिसरात दाट धुके पसरले होते.