Type Here to Get Search Results !

चंपाषष्ठी....म्हणून जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात

चंपाषष्ठी....म्हणून जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात
विशेष प्रतिनिधी...
वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबरचा महिना सुरु झाला असून यात मार्गशीर्ष महिन्याला विशेष असे महत्त्व असते. या काळात खंडोबाची नवरात्री आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते. हा महिना धार्मिकदृष्ट्या अधिक पवित्र मानला जातो.
महिन्यातील २ डिसेंबरपासून मार्गशीर्ष मास सुरु झाला असून मार्तंडभैरव षडरात्रोत्सवचाही प्रारंभ झाला. तसेच या दिवशी देव-दिवाळी देखील साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबाची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात.
मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्ठीपर्यंत ६ दिवस नवरात्री असते. पुरंदर तालुक्यातील जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात. यंदा चंपाषष्ठी सात डिसेंबरला शनिवारी रोजी असणार आहे.
चंपाष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते. हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो.
चंपाषष्ठी महत्त्व थोडक्यात माहिती...
भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणि या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण अशी आख्यायिका म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात. या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रुप घेतले होते. हे युद्घ अवघ्या ६ दिवसांनी संपले. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती. हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो असे हे सांगितले जाते.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test