सोमेश्वरनगर ! मु.सा काकडे महाविद्यालयातील आर्यवीर पाटीलची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवद
सोमेश्वरनगर- महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ४/११/२०२४ ते ७/११/२०२४ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे, बालेवाडी पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण (ब्रेस्टस्ट्रोक २००मीटर प्रथम क्रमांक, १००मीटर,५०मीटर द्वितीय) स्पर्धेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील आर्यवीर अश्विनकुमार पाटील(इयत्ता ११वी वाणिज्य, १७ वर्षे वयोगट) प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवून गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.यशस्वी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष.सतीश काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे यांनी अभिनंदन केले.यशस्वी खेळाडू विद्यार्थ्याला प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप, सुप्रिया काकडे देशमुख-पाटील यांनी मार्गदर्शन केले.