बारामती :बारामती एम. आय. डी. येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडाळचे गोदामात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.त्यामुळे या गोदामा समोरील डायनामिक्स कंपनी ते भारत फोर्ज कंपनी एमआयडीसी कडे जाणारा रस्ता शनिवारी(दि २३) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.
याबाबत जिल्हा निवडणुक तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अधिसुचना जाहिर केली आहे. त्यानुसार शनिवारी एम. आय. डी सी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडाळचे गोदामात मतमोजणी प्रकीया होणार आहे. या ठिकाणी उमेदवार व त्याचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात जमुन गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवशी बारामती एम.आय.डी.सी येथील डायनामिक्स कंपनी ते भारत फोर्ज व भारत फोर्ज कपंनी ते डायनामिक्स कंपनी रस्ता असा दोन्ही बाजुचा रोड वाहतुकी करीता ताप्तुरते स्वरूपात बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
.