जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब येथील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी
कळंब - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय आंतर महाविद्यालयीन कुस्ती मुले स्पर्धा मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब येथील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करित तीन पदके संपादित केली.फ्री स्टाईल क्रीडा प्रकारामध्ये 97 किलो वजन गटामध्ये कु. बाबासाहेब तरंगे (fyba) या खेळाडूने सुवर्णपदक संपादित केले. 86 किलो वजन गटामध्ये कु. महेश खोमणे (syba) या खेळाडूने सुवर्णपदक संपादित केले.ग्रेको रोमन क्रीडा प्रकारामध्ये कु. सुदेश बागल (syba) याने 77 किलो वजन गटामध्ये रजत पदक संपादित केले.वरील तीनही खेळाडूंची आंतर विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली असून सदर स्पर्धा नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहेत.
या स्पर्धेतील फ्री स्टाईल या प्रकारचे सर्वसाधारण उपविजेतेपद महाविद्यालयास मिळाले.
या यशाबद्दल इंदापूर ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. विरसिंह रणसिंग भैया, सर्व विश्वस्थ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय केसकर, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
या प्रसंगी श्री. विरसिंह रणसिंग यांनी संस्था व महाविद्यालय खेळाडूंना नेहमीच पाठबळ देत राहील असे सांगत पुढील कामगिरीकरिता शुभेच्छा दिल्या.
यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. सुहास भैरट यांचे मार्गदर्शन लाभले.