बारामतीतील वीरशैव लिंगायत समाज बांधवांचा सोहळा संपन्न.
उपक्रम स्वरूपी शिक्षण फंडातून सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ऐवजी सात विद्यार्थ्यांना लाभ मिळणार -डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी.
बारामती(विनोद गोलांडे) - बारामती नगरीतील सर्व वीरशैव लिंगायत समाज बंधू-भगिनींना कळविण्यास आनंद होतो की, हिंगाणे परिवाराने आयोजित केलेल्या गंगापूजन सोहळ्याच्या निमित्ताने प. पू. जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्री क्षेत्र काशी यांचे बारामती नगरीत दि. २२/११/२०२४ रोजी आगमन झाले. समस्त बारामतीकरांना महास्वामीजींच्या सान्निध्याचा, आशीर्वादाचा व आशीर्वचनाचा लाभ प्राप्त झाला.
महास्वामीजींच्या या दोन दिवसांच्या कार्यक्रमात सद्भक्तांकडून त्यांना जी देणगी प्राप्त झाली ती सर्व रक्कम बारामतीकरांच्या शिक्षण फंडामध्ये वर्ग करण्याची सूचना श्री. ष. ब्र. १०८ शिवानंद शिवाचार्य वाळवेकर महाराज यांच्याकेडे केली आहे. सन २००५ साली बारामतीत झालेल्या महास्वामीजीच्या श्रावणमास तपोऽनुष्ठानातील देणगी व तुलाभार यातून त्यांना जी रक्कम प्राप्त झाली होती, त्या रकमेचे बँकेत शिक्षण फंड खाते महास्वामीजींनी काढलेले आहे व त्यावरील व्याजातून दरवर्षी ६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत आहे. महास्वामीजींच्या आदेशानूसार पुढील वर्षापासून ६ ऐवजी ७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. महास्वामीजींच्या या आदेशासाठी बारामतीकर त्यांचे सदैव ऋणी आहेत.
महास्वामीजींना कोटी कोटी प्रणाम, तसेच हिंगाणे परिवाराचे सर्वांच्या वतीने जाहीर आभार मानले.