बारामती - बारामती विधानसभा मतदारसंघात लोणी भापकर, मेडद, कऱ्हावागज येथे 'गजर लोकशाहीचा' या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. मतदारांकरीता मतदार केंद्रावरील सुविधा, वोटर हेल्पलाईन ॲप, हिरकणी कक्ष, पाळणाघर, सक्षम ॲप आदी बाबींचा माहिती दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप समन्वयक सविता खारतोडे यांच्या संकल्पनेतून या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. २० तारखेला सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आले.