बारामती प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर च्या सुपुत्राने बारामतीचे नाव पुन्हा एकदा अबॅकस स्पर्धेमध्ये यश मिळवत भारत देशामध्ये जळकवले आहे .नुकत्याच कोलकत्ता येथे झालेल्या एसआयपी अबॅकस स्पर्धेमध्ये वडगाव निंबाळकर (ता बारामती)चा रहिवासी असलेला चिरंजीव कु.शिवराज सचिन शितोळे व आई रेखा शितोळे यांचा चिरंजीव सद्या सोमेश्वर विद्यालय सोमेश्वर नगर येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने ११ देशांमधून आलेल्या स्पर्धकांमध्ये लेवल तीन मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये चॅम्पियन पदक आहे.
या स्पर्धेसाठी आई-वडील तसेच धनश्री आंबवले , रुपाली पवार शिक्षक म्हणून यांचे मार्गदर्शन लाभले.
या मिळालेल्या यशामुळे बारामती तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवल्याने त्याचे बारामती तालुकासह वडगाव निंबाळकर व सोमेश्वर पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातून कौतुकाचा वर्षा व अभिनंदन होत आहे.
विधानसभा निवडणूक अनुषंगाने अजित पवार यांचा सोमेश्वर परिसरातील निंबुत , वाणेवाडी करंजेपुल ,वडगाव निंबाळकर येथील गावं भेट संपर्क दौऱ्याप्रसंगी वडगाव निंबाळकर येथील सभेमध्ये आपल्याच तालुक्यातील अबॅकस स्पर्धेमध्ये भारत देशामध्ये नाव झळकवलेला शिवराज सध्या कोलकत्याला असल्याने त्याच्यावतीने वडील सचिन शितोळे यांचा हार शाल पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. शिवराज ला पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा ही दिल्या.