सोमेश्वरनगर - शिक्षण शिकत असलेल्या एका १७ वर्षीय पीडितिने दाखल केलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी अविनाश नानासो पवार रा. वाणेवाडी( ता. बारामती ) व तुषार सुरेश गुलदगड रा. पळशी (ता.बारामती) हे पीडितेस अश्लील हावभाव करुन तिला लज्जा लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने दोघांवर पोक्सो अंतर्गत वडगाव निंबाळकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित ही मु.सा.काकडे कॉलेजमधील सायन्स बिल्डींग मधुन जात असताना अविनाश पवार याने वाईट नजरेणे पाहन पीडितेस "मिकी माउसकशी आहेस, तु मला तु आवडतेस अरसे म्हणुन अश्लील हावभाव करुन पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
तसेच अविनाश पवार हा सुमारे एक वर्षापासुन तर तुषार गुलदगड हा मागील सहा महिन्यापासुन पीडितेचा पाठलाग करुन फिर्यादीसअश्लिल इशारे करुन फिर्यादीवरती अश्लिल टोमणे मारुन वारंवारत्रास दिलेमुळे त्यांचे त्रासाला कंटाळुन मार्गील दोन महिन्यापासुनफिर्यादी हे एस. टी.बस ने येणेचा प्रवास बंद केला असुन ते यादोघांचे भितीमुळे महाविद्यालयाच्या एका शिक्षकासोबत त्यांच्याचारचाकी वाहनातुन कॉलेजमध्ये येत जात आहे. त्यानंतर पीडित हीबस स्टॅ्डवर येत नाही हे दोन्ही आरोपींना समजल्यावर त्यांनीपीडितेस कॉलेजमध्ये येवुन त्रास देण्याचे सुरुच ठेवले होते. या सर्वगोष्टींना त्रासून पिडीतेचे मानसीक स्थिती खुप खराब झाली असुनअभ्यासामध्ये देखील लक्ष लागत नाही. त्यामुळे घाबरुन सदर घडलाप्रकार कॉलेजमधील प्राचार्य व शिक्षकांना सांगीतला. यानंतर पीडितेने पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हादाखल केला. पुढील तपास वडगाव निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल दूरक्षेत्रेचे पी एस आय राहुल साबळे करत आहे.