बिग बॉस मध्ये विनर झालेल्या सुरज चव्हाण ला भेटायला आलेल्या मित्रांना मारहाण; वडगांव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.
मिळालेल्या माहितीनुसार 1) गु.र.नं:- 376/2024 भा न्या संहीता क 118(1),115,352,351(2),(3),3(5),324(6)
2) फिर्यादी :- श्री राहुल कांतीलाल बोराडे वय 28 वर्षे धंदा नोकरी रा. रांजणगांव ता.शिरुर जि.पुणे मो.नं. 7028686600
3) आरोपी :- 1) तुकाराम सदाशिव खोमणे 2) शुभम तुकाराम खोमणे 3) गौरव धोंडीबा खोमणे 4) ऋषीकेश वैभव नानावटे सर्व रा.मुर्टी ता.बारामती जि.पुणे
4) गुन्हा घडला - दिनांक 07/1/2024 रोजी रात्री 09:30 वा.चे सुमारास मौजे मोडवे येथील मरीमाता मंदीराचे समोर ता.बारामती जि पुणे येथे
5) गुन्ह्यातील हत्यार - लाकडी दांडके
6)हकीकत- वर नमुद केले तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी तसेच भाऊ संजय कांतीलाल बोराडे,मित्र अजय खलसे, अविष्कार खोमणे, आदिनाथ बोडरे असे सुरज चव्हाण यास भेटणेसाठी आले असताना ते लघुशंकेसाठी मरीमाता मंदीराचे पाठीमागे जात असताना आरोपी मजकुर हे फिर्यादीचे जवळ आले व म्हणाले की, तुम्ही सुरज चव्हाणला भेटणेसाठी का आला असे म्हणुन आरोपी नं 2 याने फिर्यादीचे डोक्यात लाकडी दांडके मारलेने फिर्यादी मोठ्याने ओरडले व खाली पडले, गौरव धोंडीबा खोमणे याने लाकडी काठीने फि चे डावे पायावर नडगीवर,मांडीवर मारहाण केली आरोपी नं 1 व 4 यांनी हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करीत शिविगाळ,दमदाटी केली आहे. व आरोपी नं 1 याने फि चा मोबाईल फोडून नुकसान केले आहे.वगैरे मजकुराची फिर्याद आलेने सदरचा गुन्हा रजिस्टरी दाखल केला असुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्याची तजवीज ठेवलेली आहे .पुढील तपास वडगाव निंबाळकर चे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नागटिळक साहेब करत आहे.