Type Here to Get Search Results !

सोमेश्वर'मध्ये भद्रपदी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा

सोमेश्वर'मध्ये भद्रपदी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा 
सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील करंजे सोमेश्वरनगर मध्ये भद्रपदी बैल पोळा मोठ्या उत्साहात बुधवार दि. २ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला.. ग्रामीण भागात बळीराज्याचा मित्र बैलाचा यादिवशी नवरदेवासारखा थाट..बैलपोळा निमित्त घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधून सणाला सुरुवात झाली. 

सायंकाळच्या सुमारास सजवलेल्या देखण्या बैलांची वाजंत्र्यांच्याप्प तालावर बैल जोड्यांची मारुती मंदिर दर्शन घेऊनच करंजे सोमेश्वर नगर परिसरात भव्य मिरवणूक काढली जाते अशी परंपरा आहे.

या मिरवणुकीत ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सोमेश्वर नगर परिसरातील मुर्टी, मागरवाडी,करंजे, गायकवाड वस्ती,सोरटेवाडी,होळ,आठफाटा या गावामध्ये पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो,
सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बैलजोडी प्रमाण घटले असले तरी सोमेश्वरनगर परसातील काही गावांमध्ये या परंपरा जतन होत आहे.

ग्रामीण भागात बैलपोळा हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय उत्साहाचा सण आहे. या दिवशी शिंगे साळून त्याला हुंगुळ लावण्याची प्रथा आहे. आंबाडीचे सुत काढून त्याची वेसन नविन बैलाच्या नाकात घातली जाते. नविन घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. वर्षभर शेतात राबणारा बैल पोळयाच्या दिवशी मात्र नवरदेव असतो. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी त्याला धुवीत, रंगवीत, सजवीत 

शेतकऱ्यांसाठी अतियश उपयुक्त प्राणी म्हणून बैल ओळखला जातो. बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलाच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. पण हा दिवस अंधश्रद्धा बाळगून साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून हा सण साजरा करण्याची गरज आहे. आषाढ, श्रावण किंवा भाद्रपद आणि कार्तिक महिन्याच्या अमावस्येला प्रदेशपरत्वे बैलपोळा सण साजरा केला जातो. 
श्रावण अमावस्या व भाद्रपद अमावस्या या दोन अमावस्या बैलपोळा म्हणून ओळखल्या जातात. बैलपोळा, नंदीपोळा व बेंदूर असे लोकसंस्कृतीत तीन वेगवेगळे प्रकार आहेत. 

 फोटो ओळ- करंजे परीसरातील शेतकरी आपल्या बळीराज्याचा एकत्रित सण साजरा करताना. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test