Type Here to Get Search Results !

परिपूर्ण अनुभवाशिवाय व्यवसायात उतरणे धोकादायक - विजय पवार.

Press note..

परिपूर्ण अनुभवाशिवाय व्यवसायात उतरणे धोकादायक - विजय पवार.
बारामती प्रतिनिधी -  बारामती बिजनेस चौक आणि शरयू टोयोटा यांच्या संयुक्त विद्यमाने बाराखडी उद्योजकतेची या विषयावर पुणे येथील श्री विजय पवार यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम बारामती कुस्तीगीर संघाशेजारील ज्येष्ठ नागरिक संघ येथे पार पडला. यामध्ये विजय पवार यांनी स्किलद्वारे व्यवसायातील डिजिटल नेतृत्व तसेच स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्राम आणि google प्रीमियर वेबसाईट अभ्यासक्रम यासोबतच व्यवसाय करतानाच्या महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत व्यवसायिकांना समजून सांगितल्या. या कार्यक्रमास बारामती आणि परिसरातील 45 व्यावसायिक उपस्थित होते. बारामती मधील उद्योजकांसाठी व्यवसायिक चळवळ उभी राहावी या उद्देशाने बारामती बिजनेस चौक काम करत आहे. या उपक्रमाचा हा नववा भाग होता. या कार्यक्रमाला शरयू टोयोटा चे प्रसाद शेळके यांनी देखील व्यवसायिकांना मार्गदर्शन केले व प्रायोजकत्व स्वीकारले होते. 
यावेळी विजय पवार यांनी सांगितले की आपल्याला शाळेपासूनच व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवले गेले पाहिजे. पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहारिक ज्ञानावर आधारित शिक्षण प्रणाली सुरू केली पाहिजे. व्यवसाय आणि उद्योग यामधील फरक समजून आपण ते करू शकतो का  ? उपलब्ध परिस्थितीमध्ये व्यावसायिकाने तोटा सहन करण्याची मानसिकता ही अंगीकारली पाहिजे असे मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test