यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांची दमदार कामगिरी ; यवत दौंड व उरुळी कांचनन हद्दीत जबरी चोरी व घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद.
पुणे जिल्हा प्रतिनिधी
यवत, दौंड व उरुळी कांचन पोलीस स्टेशन हददीत रात्री दरोडा, जबरी चोरी, घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करून २० गुन्हे उघडकीस, सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने, मोटारसायकल असा सुमारे ८ लाखाचा मुददेमाल हस्तगत करणेत आलेला आहे. यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांची कारवाई. मिळालेल्या माहितीनुसार
दि. ०४/१०/२०२४ रोजी २१:३० वा चे सुमारास मौजे कानगाव ता. दौंड जि. पुणे पुणे गावचे हददीत रेल्वे पुलाचे जवळ काही इसम मारक हत्यारे व मोटार सायकली जवळ बाळगुन दरोडा घालण्याचे तयारीत असल्याची बातमी यवत पोलीस स्टेशन अंतर्गत पाटस दुरक्षेत्र येथील पोलीस उप-निरीक्षक सलीम शेख यांना स्थानिक गावक-यांनी माहिती दिल्याने पोलीस उप-निरीक्षक सलीम शेख यांनी सदर माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, यवत पोलीस स्टेशन यांना दिली. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सदर ठिकाणी जाउन योग्य ती कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
सदर ठिकाणी पोलीस उप-निरीक्षक सलीम शेख तसेच स्टाफ व गुन्हे शोध पथक, यवत पोलीस स्टेशन यांनी सदर ठिकाणी जाउन पाहणी करत असताना सदर इसमांनी गावातील लोक त्यांचेकडे येत असल्याचे पाहून त्यांनी त्यांच्यां दोन्ही मोटार सायकलला आग लावून पळून जात असताना त्यापैकी एका इसमांस पकडले असता व त्यांचेकडे अधिकची चौकशी केली असता त्याने त्याचे नावे सिध्दू रसिकलाल चव्हाण वय १९ वर्षे, रा. इनामगाव ता. शिरूर जि. पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे लोखंडी कोयता मिळून आला. त्यास त्याचेबरोबर असलेल्या इतर साथीदारांबाबत विचारले असता त्याने त्यांची नावे-
१ ) दिपक रसिकलाल चव्हाण रा. इनामगाव ता. शिरूर जि. पुणे
बाबुशा गुलाब काळे वय २१ वर्षे, रा. शेडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर
२) ३) प्रशांत फोटया उर्फ बंडू काळे रा. राक्षसवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर
४) हनुमंत फोटया उर्फ बंडू काळे रा. राक्षसवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर
असे असल्याचे सांगितले. तेव्हा पळून गेलेल्या आरोपीतांचा शोध घेतला असता त्यामधील बाबुशा गुलाब काळे वय २१ वर्षे, रा. शेडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर हा दौंड पोलीस स्टेशन हददीत मिळुन आला. त्याचेकडे चौकशी केली असता आम्ही सर्वजण कानगांव येथे दरोडा टाकण्याच्या उददेशाने आलो होतो व अंधार होण्याची वाट पाहत होतो असे सांगितले.
सदर बाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं ९७९/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३१०(४) (५) प्रमाणे दाखल करून दोघांनाही अटक केले होते सदर गुन्हयाचा तपास करत असताना त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी यवत, दौंड, उरुळी कांचन पोलीस स्टेशन हददीत रात्रीच्या घरफोड्या, दरोडा, जबरी चो-या केल्या असल्याचे सांगितल्याने एकुण २० गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यांचेकडुन तपासादरम्यान गुन्हयातील चोरी केलेले सुमारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दोन मोटारसायकली असा सुमारे ७ लाख रूपये किं. चा मुददेमाल हस्तगत करणेत आलेला आहे. त्यांनी यवत दौंड व उरुळी कांचनन हद्दीत गुन्हे केले असल्याची कबुली दिलेली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. पंकज देशमुख साो पुणे ग्रा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. गणेश बिरादार सो बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापुराव दडस साो, दौंड विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांचे मार्गदर्शनाखली सहा. पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उप-निरीक्षक सलीम शेख, पोलीस उप-निरीक्षक किशोर वागज, सहा. फौजदार महेंद्र फणसे, पोहवा / ३३२४ कानिफनाथ पानसरे, पोहवा /२४६० हिरालाल खोमणे, पोहवा /१९२९ गुरुनाथ गायकवाड, पोहवा /१६०० संदीप देवकर, पोहवा/२०८२ महेंद्र चांदणे, पोहवा /२१८१ अक्षय यादव, पोहवा /२०९४ रामदास जगताप, पोहवा /२३४४ विकास कापरे, पोकॉ/२६५८ मारुती बाराते, पोकॉ/१७२ गणेश मुटेकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा सचिन घाडगे, पोहवा शेख, पोहवा अजित भुजबळ, पोहवा योगेश नागरगोजे, पोहवा विजय कांचन, पोहवा राजु मोमीण यांनी केलेली असुन आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक सलीम शेख करत आहेत.