सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौधरवाडी येथे शाळा व्यवस्थापन समितीची मासिक सभा संपन्न झाली त्या सभेत " मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या उपक्रमात सोमेश्वर केंद्रात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ग्रामस्थ चौधरवाडी यांच्या वतीने शिक्षक नंदकुमार कदम व बापूराव जाधव यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देत गौरविण्यात आले.
तसेच उत्कृष्ट शाळा व्यवस्थापन,१००% प्रगत विद्यार्थी, आनंददायी शालेय वातावरण, विद्यार्थ्यांना दिला जाणारा उत्कृष्ट आहार आहारात परसबागेतील भाज्यांचा वापर व शाळेत राबवत असलेले सर्व उपक्रम यांची उत्कृष्ट अंमलबजावणी आणि माता पालक आणि सर्व पालकांचा सक्रिय सहभाग या सर्व उपक्रमांचे नियोजन उत्तमरीत्या करत असले बद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत पापळ, उपाध्यक्ष महेंद्र पवार आणि सर्व सदस्य तसेच सरपंच शशांकभैय्या पवार तसेच ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ चौधरवाडी यांच्या वतीने पुढील काळातही शाळा प्रगतीपथावर राहील अशा आश्वासन कदम सर यांनी दिले तर संतोष भगत यांनी आभार मानले.