बारामती येथे मतदार जागृती उपक्रम संपन्न
बारामती- बारामती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बारामती येथे विद्यार्थ्यांची वोट आकाराची साखळी करून मतदार जागृती करण्यात आली.
स्वीप प्रमुख सविता खारतोडे, मुख्याध्यापक गणपत तावरे, पर्यवेक्षक बाळकृष्ण सुतार क्रीडाशिक्षक सुजित जाधव, विकास जाधव सुनील मस्के, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. त्यांना मतदान जनजागृतीपर संकल्पपत्राचे वितरण करण्यात आले.