सोमेश्वरनगर ! कराटे स्पर्धेत आदित्य घाडगे ब्राऊन बेल्ट मध्ये प्रथम.
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिग मार्शल आर्टच्या वतीने विविध बेल्टसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत आदित्य घाडगे ब्राऊन बेल्ट शंभू कांबळे ऑरेंज बेल्ट ओंकार हाके येलो बेल्ट यांनी प्रथम क्रमांक पटकावला.न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी शाळेमध्ये या स्पर्धा पार पडल्या.स्पर्धेचे उद्घाटन खरेदी-विक्रीचे संचालक विक्रम भोसले यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत सोमेश्वरनगर, वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी, दहाफाटा येथील मुला- मुलींनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी : ओवी काकडे ,मनस्वी जेधे ,स्वयरा जगताप ,सोनाक्षी जेधे, सोनाक्षी सकुंडे ,शुभ्रा काकडे ,तनिष्का सकुंडे ,समृद्धी कारंडे ,खुशी आतार ,अदिती इधोळ
वाणेवाडी येथे पार पडलेल्या कराटे स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक.ब्लॅक बेल्ट मास्टर चंद्रकांत सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे प्रमुख प्रकाश रासकर हे ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट्स प्रशिक्षणाचे काम मागील २३ वर्षांपासून करीत आहेत.