दीपावली सण अन् पडलेल्या धुक्या मुळे आनंद द्विगुणित... परिसर दाट धुक्यात हरवला...
सोमेश्वरनगर - मागील आठवड्यापर्यंत अवकाळी सततचा पाऊस पडत असल्याने येणारे दीपावली सण हा पावसामुळे होत आहे का नाही अशी नागरिकांमध्ये धास्ती होती ... सततचा पाऊस थांबल्याने व काही दिवसांपासून धुके पडत असल्याने फटाके स्टॉल,हॉटेल ,कापड दुकानदार, इलेक्ट्रॉनिक दुकानदार व विविध दीपावली सणानिमित्त लागणारे साहित्य स्टॉल व्यवसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे ..
दिपाली या सण हा सोमवार २८ रोजी पासून सुरू झाली काही दिवस अगोदरच बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात पहाटे दाट धुके अनुभवले मिळाले , सर्वत्रच नागरिकांमध्ये दीपावली सण अन् पडलेल्या धुक्या मुळे आनंद द्विगुणित झाला. पाऊस नसल्याने विविध प्रकारचे फटाके फोडताना लहान मुले नागरिक आनंद घेताना दिसत आहे.दीपावली सण कुटुंबात समवेत आनंदमय सुरू असल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे.