सोमेश्वरनगर ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथ संचलन व विजयादशमी उत्सव सोमेश्वरनगर येथे संपन्न.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी-बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर मध्ये दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथ संचलन व विजयादशमी उत्सव सोमेश्वरनगर येथे संपन्न झाले, सायंकाळी ०५ वा. सोमेश्वर विद्यालय मैदानात संपन्न करून सघोष संचलन सुरू झाले आणि सोमेश्वर साखर कारखाना येथे संपले.आणि नंतर शस्त्रपूजन कार्यक्रम घेण्यात आला.
या उत्सवासाठी प्रमुख अतिथी मदनराव काकडे देशमुख प्रमुख वक्ते अंकुरजी उमडेकर दिपकराव पेशवे-
बारामती जिल्हा संघचालक आणि तालुका कार्यवाह अमोलजी देशमुख उपखंडातील स्वयंसेवक आणि नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना अंकुरजी उमडेकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विजयादशमी उत्सव याबद्दल माहिती दिली त्याचबरोबर समाजामध्ये आपण वावरत असताना संघाचे आचार विचार आणि संस्कार हे आत्मसात केले पाहिजेत त्याचबरोबर सर्वांनी नागरिक शिष्टाचाराचे पालन करून हिंदू समाज एकसंध ठेवण्याचं काम केलं पाहिजे असे सांगितले.संघाला पुढील वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत, संघाची शाखा हे व्यक्ती निर्मणाचे केंद्र आहे.समरसता, हिंदू संस्कृती या बद्धल माहिती श्री उमडेकर यांनी दिली.
सोमेश्वर उपखंड प्रमुख प्रास्ताविक चेतनकुमार सकुंडे यांनी केले