Type Here to Get Search Results !

बारामती ! माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक अनुषंगाने रूट मार्च

बारामती ! माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक अनुषंगाने रूट मार्च
बारामती प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने आचार संहिता कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, या करीता आज दिनांक - 27/10/2024 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 12.45 वा चे दरम्यान 
मौजे माळेगाव बु नगरपंचायत हद्दीत निरा- बारामती मार्गाने गोफणेवस्ती फाटा ते राजहंस चौक - आण्णाभाऊ साठे चौक, व माधवानंद थिएटर चौक असा तसेच मौजे सांगवी गावात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ते शिरवली रस्ता या मुख्य मार्गावर , तसेच मौजे निरावागज गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा निरा वागज ते मस्जिद असा रूट मार्च घेण्यात आलेला आहे. सदर रूट मार्चमध्ये माळेगाव पोलीस स्टेशन कडील 03 अधिकारी व 20 अंमलदार, केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचे एकूण 01 अधिकारी व 24 जवान, तसेच पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण यांच्यातील दंगल नियंत्रण पथक मधील 15 अंमलदार सहभागी झालेले होते.
   
   

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test