शालेय साहित्य व रक्तदान करत श्री सोमेश्वर कारखाना चेअरमन पुरषोत्तम जगताप यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील आजी माजी सैनिक संघटना तालुका मुख्य शाखा सोमेश्वर नगर व बहुजन समाज सेवा संघ करंजे वतीने शालेय साहित्य व शिवाजी महाराज प्रतिमा भेट व रक्तदान देत श्री सोमेश्वर कारखाना चेअरमन पुरषोत्तम जगताप यांना रविवार दिनांक 27 रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .
यावेळी आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, मेजर ताराचंद शेंडकर, सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी अध्यक्ष भाउसो लकडे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेंडकर, बहुजन समाज सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पोपट हुंबरे, भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे सह इतर मान्यवर उपस्थित होते.