उन्नती कर्ज योजना म्हणजे अल्पसंख्यांकांच्या व्यवसायाला चालना देणारी - खा.सुनेत्रा पवार
बारामती: मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची उन्नती कर्ज योजना म्हणजे अल्पसंख्यांक समाजातील लोकांच्या व्यवसायाला चालना देणारी योजना असल्याचे प्रतिपादन राज्यसभेच्या खासदार सौ.सुनेत्रा पवार यांनी केले.
एकता ग्रुप व आलताफ सय्यद मित्र परिवाराच्या वतीने बारामती शहर व तालुक्यातील 250 छोट्या व्यवसायिकांना प्रत्येकी 3 लाख व 30 महिला बचत गटांना प्रत्येकी 2 लाख असे मिळून 8 कोटी 10 लाख रूपयांचे कर्ज मंजूरी पत्र वाटपाप्रसंगी सौ.पवार बोलत होत्या.
या कार्यक्रमास मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन मुश्ताक अंतुले हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश गोफणे, तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन शेंडे, बारामती व्यापारी महासंघाचे खजिनदार फक्रुशेठ भोरी, मौलाना आझाद महामंडळाचे एन.आर.खान, रहीम मुलानी, इकबाल शेख, निसार शेख, युसूफ इनामदार, जाकीर शेख, महेबुब बागवान, सौ.यास्मिन बागवान, सौ.फरीदा सय्यद इ.मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खा.पवार म्हणाल्या की, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही. बारामतीच्या कोणत्याही व्यक्तीचा काही प्रश्र्न निर्माण झाल्यास तो प्रश्र्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. प्रत्येक समाजाचा विकास व्हावा हा त्यांचा उद्देश असतो. येणार्या काळात सुद्धा असेच प्रेम तुम्ही ना.अजित पवार यांच्यावर कराल असेही त्या म्हणाल्या. येणार्या काळात घेतलेल्या कर्जाचा विनियोग चांगला करावा असेही त्यांनी लाभार्थ्यांना सांगितले. बारामती तालुका एकमेव तालुका असेल त्याठिकाणी आतापर्यंत 15 कोटीचे कर्ज मंजूर दादांच्या माध्यमातून मिळाले आहे. आलताफ सय्यद व त्यांच्या टीमचे भरभरून कौतुक केले.
राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या सहकार्याने व मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांच्या पाठपुराव्याने बारामती शहर व तालुक्यातील 250 छोटे व्यवसायिकांना प्रत्येकी 3 लाख रुपये व 30 महिला बचत गटाला प्रत्येकी दोन लाख रुपये असे मिळून 8 कोटी 10 लाख रुपयांचे कर्ज मंजूरी पत्र यावेळी देण्यात आले.
याप्रसंगी मुश्ताक अंतूले, सचिन सातव, अविनाश गोफणे, नितीन शेंडे इ. मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आलताफ सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन हाजी कमरुद्दीन सय्यद यांनी तर आभार तैनुर शेख यांनी मानले.