सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारे कर्तव्यावर असताना मयत पावलेले पोलीस अंमलदार कै.संदीप पांडुरंग मोकाशी राहणार होळ आटफाटा व कै.गणेश बाबासो भांडलकर राहणार होल गीते वस्ती यांचे घरी जाऊन कुटुंबीयांना.पंकज देशमुख पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे दिवाळीनिमित्त भेट वस्तू ,फटाके आणि मिठाई बॉक्स अशी सांत्वन पर भेट देऊन दिवाळीनिमित्त कुटुंबियांना शुभेच्छा देण्यात आल्या.
शहिदांचे घरातील सदस्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.