माळेगाव पोलीस स्टेशन ने लाखो रुपयांचे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेत.. त्या नागरिकांना दिले परत... नागरिकांनी मानले आभार.
बारामती प्रतिनिधी - माळेगाव पोलिसांनी परत केले २ लाख रुपये २९ हजार किमतीचे १४ मोबाईल माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात नागरिकांचे हरवलेल्या मोबाईल संदर्भाने माळेगाव पोलीस ठाणे येथे नोंदविलेल्या तक्रारी मधील मोबाईल शोध घेणे साठी मा.पंकज देशमुख सो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार सो अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.डॉ.. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी विशेष मोहीम सुरू केलेली आहे.
त्या मोहीम अंतर्गत कामकाज पाहणारे पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप, गोपनीय विभाग, माळेगाव पोलीस स्टेशन यांनी माळेगाव कार्यक्षेत्रात हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी मा पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण यांचेकडे पत्रव्यवहार करून त्यांचे कडून प्राप्त माहितीचे संकलन आणि तांत्रिक विश्लेषण करून एकूण २ लाख २९ हजार ५०० रुपये किमतीचे एकूण १४ मोबाईल फोनचा शोध घेतलेला आहे.
सदर एकूण १४ मोबाईल आज दसरा सणाच्या दिवशी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे सो यांच्या हस्ते मूळ तक्रारदार यांना परत दिलेले असून नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त करून माळेगाव पोलिसांचे आभार मानलेले आहेत.