सोमेश्वरनगर - महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचलनालय पुणे अंतर्गत अहमदनगर येथे आयोजित केलेल्या विभाग स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत मु.सा काकडे महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी केली.यशस्वी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे- देशमुख.महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे,संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचर्य प्रा.जयश्री सणस, पर्यवेक्षक आर.बी गोलांदे, महविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य प्रा.सुजाता भोईटे यांनी अभिनंदन केले. पुढील कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी खेळाडू विद्यार्थी सय्यद अली रियाज- सिल्वर मेडल
(खुलागट) १९वर्ष वयोगट, पिंगळे सौरभ-सिल्वर मेडल
(ग्रीको रोमन,१९वर्ष वयोगट ५५किलो वजनगट),गोंजारी संग्राम-ब्रांझ मेडल (१७वर्ष वयोगट, ९२किलो वजनगट) ,कर्चे जय सुनील - सिल्वर मेडल
(१७वर्ष ९२किलो वजन गट) , ठोंबरे समर्था तानाजी - सिल्वर मेडल(१७ वर्ष वयोगट,४९किलो वजन गट) ,पवार आदित्य-ब्राँझ मेडल (१९वर्ष वयोगट,६०किलो वजन गट)
यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांना प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप यांनी मार्गदर्शन केले.