सोमेश्वरनगर - बारामती पश्चिम भागातील बच्चे कंपनी किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्यात मग्न झाले असल्याचे दिसत आहे अत्याधुनिक युग असल्याने गुगल सर्च करत काही पुस्तकातील इतिहासकालीन विविध किल्ल्यांची प्रतिकृती या सुटीच्या काळात माती, दगड व विटांनी बनवत असतात. त्यांची हुबेहुब किल्ले बनविण्याची कला मोठ्यांनाही चकीत करणारी असते. आता मुलांच्या परीक्षा संपल्याने व दीपावली सुट्टी लागल्याने बच्चे कंपनी किल्ले बनविण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. तसेच हे किल्ले तयार करण्यासाठी सोमेश्वरनगरची मुख्य बाजारपेठेमध्ये विविध साहित्य उपलब्ध आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी मंडळी घरातील साहित्य खरेदी करण्यात व्यग्र, तर महिला फराळ बनवण्याच्या गडबडीत असतानाच बालगोपाळ किल्ले बनवण्यात मग्न झाले आहेत. आजच्या स्मार्ट युगातील या किल्लेदारांची मातीने बनलेली तोफा, हत्ती, घोडे, मावळेब यांची प्रतिकृती तयार झाले असून बाजारात विक्रीसाठी दाखल आहेत.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यामंध्ये शिवनेरी, रायगड, प्रतापगड, तोरणा, सिंहगड, पन्हाळा, विशाळगड, हरिश्चंद्र गड, राजगड असे विविध किल्ल्याचे प्रतिरूप वेगवेगळ्या आकारात बनविण्यात येत आहेत. लहान मुलांना किल्ला तयार करण्याच्या कामातून ऐतिहासिक माहिती मिळते. प्रत्येक किल्ल्यांचा इतिहास वेगळा आहे. तसेच मुलांच्या सृजनशीलतेचा विकास होतो.
पूर्वी दिवाळीची सुट्टी सणाला प्रारंभ होण्याआधी किमान आठवडाभर आधीच किल्ले बनविण्यास सुरू होत असे. यंदा मात्र शाळांच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या आहेत. दीपावली ची सुट्टी असल्याने बच्चे कंपनी किल्ले बांधणीसाठी लगबग सुरू तर काहींचे पूर्णत्वाला आले आहे.
.