बारामती विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून नझीम खान यांची नियुक्ती
बारामती : भारत निवडणूक आयोगाकडून बारामती विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नझीम खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
श्री.खान यांनी बारामती तहसील कार्यालय येथील विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात निवडणूक कामकाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्षांना भेटी दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील नामनिर्देशन प्रक्रियेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी टपाली मतदानाच्या प्रक्रियेचा आढावा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत माहिती घेतली.
श्री. नझीम खान यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-३०३ असा आहे. त्यांना सोमवार आणि बुधवार सकाळी ११ ते १२ यावेळेत भेटता येईल. त्यांचा संपर्क क्रमांक ९२७२१७९६६३ असा आहे. श्री.नझीम खान यांचे संपर्क अधिकारी श्री. राजेंद्र खंडाईत हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४२२४५८५१० असा आहे, अशी माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.