आदर्श आचारसंहितेमुळे ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचे अर्ज स्वीकारणे बंद
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, असे समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी कळविले आहे.
या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांकडून स्वीकारण्यास ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून या योजनेंतर्गत अर्ज स्वीकारण्याबाबत मुदतवाढ लागू राहणार नाही, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.