बारामती तालुक्यात मतदार जनजागृती रॅली संपन्न
बारामती - बारामती विधानसभा मतदारसंघातील चौधरवाडी आणि वंजारवाडी येथे मतदार जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली.
यावेळी स्वीप समन्वयक अधिकारी सविता खारतोडे, चौधरवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भीमराव सटवाजी, वंजारवाडी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा भालेराव आदी उपस्थित होते.
मतदार जनजागृतीकरीता आयोजित रॅलीमध्ये चौधरवाडी आणि वंजारवाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपले मत आपले भविष्य, मतदान आपला हक्क आदी घोषणा दिल्या. ‘वोट’ या अक्षराची विद्यार्थी साखळी करून विदयार्थी आणि पालक यांना मतदानाचा अधिकार आणि मतदानाची संविधानात्मक जबाबदारीबाबत श्रीमती खारतोडे यांनी मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांना मतदान संकल्प पत्राचे वाटप करून त्यांच्या कुटुंबातील मतदानास पात्र व्यक्तींकडून भरुन घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.