उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते 'आशा'साॅफ्टवेअर व मात्र साॅफ्टवेअर हस्तांतरण मोफत टॅब व पॉइंट-ऑफ-केअर उपकरणांचे वितरण संपन्न.
मुंबई - महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई व आय आय केअर फाउंडेशन व कॅपजेमिनी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आशा साॅफ्टवेअर व मात्र साॅफ्टवेअर हस्तांतरण तसेच सर्व आशा यांना मोफत टॅब व पाॅईट ऑफ केअर डिवाईस वाटप शुभारंभ मा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळीसार्वजनिक आरोग्य विभाग चे आयुक्त अमगोथू डि श्री रंगा नायक ,मा. मिलिंद म्हैसकर (भाप्रसे) अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग,बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे ,आय आय केअर फाउंडेशन चे संचालक डाॅ संतोष भोसले , बारामती पंचायत समिती आरोग्य विभाग डॉ श्याम उपाध्ये सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देवगिरी येथे करण्यात आला. याप्रसंगी मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आलेल्या आशा चे आस्थापुर्वक चौकशी करून येणारी विविध अडचणी विषयी सविस्तर बोलणी केली.
याप्रसंगी आपल्या कार्यक्षेत्रातील विशेष कौतुकास्पद काम करणा-या आशाचे कौतुक देखील केले व हे ऑनलाईन काम कसे केले या विषयी सखोल माहिती घेतली.