सोमेश्वरनगर ! जिजाऊ हॉटेलमध्ये मिळणार.... मायेचा घास ; शरयू फाउंडेशन अध्यक्षा शर्मिलावहिनी पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न.
निरा-बारामती रस्त्यालगत सोरटेवाडी पवारवस्ती येथे हॉटेल जिजाऊ उद्घाटन समारंभ विजयादशमी औचित्य साधत मा. सौ. शर्मिलावहिनी पवार (अध्यक्ष शरयु फौंडेशन) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व महिला भगिनी युवा नागरिक तसेच शेंडकर परिवारातील सदस्य व सोमेश्वर पंचक्रोशीतील आलेले सर्वच पदाधिकारी यांना विजयादशमीच्या शुभेच्छा शर्मिला वहिनी पवार यांनी शुभेच्छा दिल्या तर पुढे बोलताना म्हणाल्या की हॉटेल व्यवसाय करत असताना आलेल्या ग्राहकांना मान देणे तसेच स्वच्छता व जेवणाची कॉलिटी मेंटन ठेवने त्याचप्रमाणे फेमस असलेला तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूरला खाणारी व्यक्ती ही तिथून जिजाऊ हॉटेल ला जेवण करायला आवर्जून आली पाहिजे अशी दक्षता घेणे अशा स्वरूपात शुभेच्छा देत उपस्थित सर्वच मान्यवरांचे स्वागत व आभार मानले व जिजाऊ हॉटेल व्यवसायाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच ज्येष्ठ सतीश मामा खोमणे यांनी सर्वत्रच व्यावसायिक मोठ्या प्रमाणात जाळे आहे परंतु जो आपले कार्य व सातत्य चांगले ठेवल त्याची प्रगती होणारच असे त्यांनी बोलताना सांगितले .. तसेच ज्येष्ठ राजेंद्रबापू जगताप यांनी हॉटेल व्यवसायासाठी सेंटर परिवाराला शुभेच्छा दिल्यावर शर्मिला वहिनी पवार यांनी आवर्जून उपस्थित राहत हॉटेलचे उद्घाटन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले व सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
जिजाऊ हॉटेलमध्ये मायेचा घास ... घेण्यासाठी सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिक यांनी कुटुंब तसेच मित्रपरिवार समवेत नक्कीच यावे असे नम्र आवाहन हॉटेल मॅनेजमेंट वतीने केले.
या उद्घाटन प्रसंगी सोमेश्वर पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिजाऊ हॉटेल उद्घाटन प्रसंगी आलेल्या सर्वच मान्यवरांचे स्वागत प्रियांका शेंडकर यांनी केले तर आभार राहुल शेंडकर यांनी मानले