घर घर माहितीचा अधिकार कायदा पोहचवा....अब्राहम आढाव
बारामती - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशान्वये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवसानिमित्त आज बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे, कार्यालय अधीक्षक अश्विनी अडसूळ, ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अब्राहाम आढाव, स्वप्निल कांबळे,मंगलदास निकाळजे, गिरीश झगडे, सचिन नरुटे, साहिल शेख, राहुल बनकर, तसेच नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. अब्राहम आढाव यांनी माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत असलेल्या विविध तरतुदी, त्याचा वापर आदी बाबाबत माहिती दिली. कार्यालयाने आपला कलम चार स्वतःहून प्रकट करणे बंधनकारक असून, नागरिकांना माहिती देणे हे आपले कर्तव्य आहे असे सांगितले, कायद्याची जनजागृती करताना घर घर माहितीचा अधिकार पोहचवण्यासाठी सामाजिक सस्था यांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. प्रजा ही राजा आहे आणि राजाला माहिती मिळविण्याचा पूर्ण अधिकार आहे. शासकीय कार्यालयत पारदर्शकता आणि नागरिकाचा सहभाग वाढविण्यासाठी माहिती अधिकार कायदा व्यापक होणे आवश्यक आहे. यावेळी माहितीचा अधिकार अर्ज करताना येणाऱ्या अडचणी, अर्जांना द्यावयाची उत्तरे याबाबत शंकाचे निरसन करण्यात आले.
अनेकांच्या माहिती अधिकार विषयी शका आणि निरसन आढाव सरानी सौम्य तेने केले.
नगर परिषदेच्यावतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडाअंतर्गत यावर्षी ‘स्वभाव स्वच्छता –संस्कार स्वच्छता’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त सामुहिक स्वच्छता शपथही यावेळी देण्यात आली.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.