हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला भावपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला
बारामती प्रतिनिधी - बारामतीतील हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला भावपूर्ण वातावरणात गणपती बाप्पाला निरोप शनिवार, दि. ०७/०९/२०२४ रोजी शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाच दिवसांचा गणपती बसविण्यात आला होता. गुरुवार, दि. १२/०९/२०२४ रोजी दु. ०३:०० वा. गणपती विसर्जन करण्यात आले. विसर्जनानिमित्ताने इ. १ली ते ४थी च्या विदयार्थ्यांनी नृत्य सादर करत श्रीगणेशाला वंदन केले. तद्नंतर १ली ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष व गणपती स्तोत्राचे पठण केले. गणपती बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण शाळा दुमदुमली.. तद्नंतर आरती करून सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती बाप्पाच्या साक्षीने सर्व नकारात्मक विचार आणि कृतींचा नाश करण्याची प्रतिज्ञा यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी केली. गणपती बाप्पा मोरया.... मंगलमूर्ती मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या....... असा जयघोष करत भावपूर्ण वातावरणात शाळेच्या आवारातच पारंपारिक पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष. अजय पुरोहित सर, महामात्र मा.डॉ. गोविंद कुलकर्णी . राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य.पी.बी. कुलकर्णी सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.