वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन तसेच करंजेपुल दुरक्षेत्र येथे"भव्य रक्तदान शिबीर" आयोजन ; रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद.
फोटो ओळ - रक्तदान शिबिर प्रसंगी खंडोबाचीवाडी येथील शिव गणेश मित्र मंडळ पदाधिकारी यांना ब्लड बँकेचे प्रमाणपत्र व गिफ्ट देताना पोलीस अधिकारी दीपक वारुळे व पत्रकार विनोद गोलांडे.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गणपती मंडळे, सर्व पोलीस पाटील तसेच सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार दि.०९/०९/२०२४ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. सकाळ पासून रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून परिसरातील विविध गणेश मंडळ तसेच नागरिकांनी रक्तदान करत आपले कर्तव्य बजावले.
तरी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेश व सोमेश्वर पंचक्रोशी हद्दीतील रक्तदात्यांनी 'रक्तदान हे श्रेष्ठदान' अनुषंगाने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.