Type Here to Get Search Results !

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस ... या तारखेला हजर राहण्याचे आवाहन

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस ... या तारखेला हजर राहण्याचे आवाहन 
पुणे : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरतीसाठी होणाऱ्या सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे १४ ते २३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी ५ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे येथे मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस परीक्षा (सीडीएस-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स ॲकेडमी परीक्षा (एनडीए-युपीएससी) उत्तीर्ण झालेला असावा. तो सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावा.

उमेदवार एनसीसी 'सी ' सर्टिफिकेट 'ए' किंवा 'बी' ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी (युनिर्व्हरसीटी एंट्री स्कीम) एस.एस.बी. कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी.साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे ५ ऑक्टोबर पर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्यापूर्वी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्लू) यांचे संकेतस्थळ https://mahasainik.maharashtra.gov.in वर जाऊन त्यामधील एसएसबी ५८ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व परिशिष्ठांची प्रत पूर्ण भरून तीन प्रतीत सोबत घेऊन यावी.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक ई-मेल आयडी training.pctcnashik@gmail.com, दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक ९१५६०७३३०६ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test