दाैंड ! गणपती विसर्जनासाठी दाैंड पाेलीसांचा चाेख बंदाेबस्त
दाैंड तालुका प्रतिनिधी सुभाष कदम - दौंड शहर व ग्रामीण भागात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसांच्या गाैरी गणेश उत्सवाच्या अनुशंगाने दाैंड पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक संताेष डाेके यांनी सर्वच गणेश भक्तांना गणेश उत्सवाचे दहा दिवस आनंदाचे,उत्साहाचे जावेत म्हणून स्वतः पाेलीस निरीक्षक संताेष डाेके यांनी दाैंड शहर व भीमानदीच्या विसर्जन घाटाची पहाणी करुन संबंधित पाेलीस अधिकारी व कर्मचारी यांनी विसर्जन मिरवणुक व नदीकिनारी चाेख बंदाेबस्त ठेण्याच्या सूचना दिल्या हाेत्या.
यामध्ये सहाय्यक पाेलीस निरीक्षक १५,ठाणेअंमलदार ६७,महिला अंमलदार ८, स्ट्राईकीन फाेर्स १ , एस.आर.पी ग्रृप ५ ची १ तुकडी,हाेमगार्ड २५ असा बंदाेबस्त ठेवण्यात आला होता.त्यामुळे या संपूर्ण दहा दिवसांच्या कालावधीत काेठे ही अपघात अथवा अनुचित प्रकार घडला नाही. दाैंड पाेलीसांच्या कार्याचे काैतुक हाेत आहे.