Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! प्रा.आदिनाथ विश्वनाथ लोंढे यांना संरक्षण व सामरिक शास्त्र विषयात पी.एच.डी.पदवी प्रदान.

सोमेश्वरनगर ! प्रा.आदिनाथ विश्वनाथ लोंढे यांना संरक्षण व सामरिक शास्त्र विषयात पी.एच.डी.पदवी प्रदान.
सोमेश्वरनगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मानव्यविद्या ( Humanities ) शाखे अंतर्गत बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालयातील प्रा. आदिनाथ विश्वनाथ लोंढे यांना संरक्षण व सामारिक शास्त्र विषयात पीएच. डी. पदवी डॉ.दिलीप मोहिते, प्राचार्य, डॉ.एम. एल. साळी, डॉ. विजय खरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
प्रा. आदिनाथ विश्वनाथ लोंढे यांनी "शीतयुद्धोत्तर कालखंडातील (१९९० ते २०१०) भारताचे संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या कार्याचा एक चिकित्सक अभ्यास"[ A Critical Study of Post Cold War period (1990-2010) India's role in U. N. Peacekeeping Operations]या विषयावर शोध प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सादर केला.
त्यांच्या शोध प्रबंधाला अंतिम मूल्यमापनाच्या समितीचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ एम. एल. साळी, तर बहि:स्थ परीक्षक महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता मा. प्रा.डॉ. दिलीप मोहिते सर यांनी मूल्यांकन केले. 
प्रा.आदिनाथ लोंढे यांना मार्गदर्शक म्हणून प्रा डॉ. विजय खरे*(विभागप्रमुख, संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) यांनी काम पाहिले.
प्रा.आदिनाथ लोंढे यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे- देशमुख,महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे-देशमुख, संस्थेचे सचिव सतीश लकडे तसेच संचालक मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्या प्रा. जयश्री सणस,पर्यवेक्षक प्रा. राहुल गोलांडे , प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, ग्रंथालय कर्मचारी, सर्व विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातील मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test