Type Here to Get Search Results !

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी सर्व संबंधितांनी चोखपणे कर्तव्य बजावावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी सर्व संबंधितांनी चोखपणे कर्तव्य बजावावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले असून त्याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी सर्वांनी दक्ष राहून चोखपणे कर्तव्य बजावावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. 

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम, निवडणूक विषयक सर्व समन्वय अधिकारी, संबंधित विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते. 

डॉ. दिवसे म्हणाले, प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण सत्र आयोजित करावेत. त्यामध्ये प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करुन प्रशिक्षण देण्यात यावे. निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि नियमांचा अभ्यास करावा. 
जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखड्यातील वेळापत्रकाप्रमाणे कामे करावीत. 

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मतदार जागृती मोहीम राबवावी. मतदान केंद्रातील बदलाबाबत मतदारांना अवगत करावे. या बाबीवर विशेष लक्ष केंद्रित करून स्वीप व्यवस्थापन कक्षाने जनजागृती विषयक विविध उपक्रम राबवावे. 

भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) पथकातील सदस्यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.  दिवसे यांनी दिल्यात.

यावेळी श्रीमती कळसकर यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी करावयाच्या कामाकाजाबाबत माहिती दिली. 

बैठकीत निवडणूक प्रक्रिया, मतदान प्रक्रिया, मतदान केंद्र, कायदा व सुव्यवस्था, निवडणूकविषयक खर्च व्यवस्थापन, आदर्श आचारसंहिता, मनुष्यबळ, साधनसाम्रुगी, ईव्हीएम स्ट्रॉंग रुम, वेबकास्टिंग, संपर्क आराखडा, मतदार जनजागृती, माध्यम कक्ष, विविध कामकाजाबाबत  चर्चा करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test