हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद
बारामती - हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद शनिवार, दि. १४/०९/२०२४ रोजी आनंददायी शनिवार अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.* या कार्यक्रमात इ.१ली व २री च्या विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण अशा वेशभूषा करून आपल्या संस्कृतीविषयी माहिती सांगितली. इ.३री,४थी च्या विद्यार्थ्यांनी श्रीगणेशाची वंदना करत नृत्य व गायन केले. इ. ५वी च्या विद्यार्थ्यांनी 'एकदंताय वक्रतुण्डाय, माझा बाप्पा किती गोड दिसतो' या गीतांवर नृत्य करत व गायन करत भक्तीमय वातावरण निर्माण केले.
१४ विदया व ६४ कलांची अधिष्ठात्री असलेली देवता म्हणजेच श्री गणेशाच्या साक्षीने मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आतुर असलेल्या इ. ६वी, ७वी आणि ८वी च्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत अतिशय सुंदर पध्दतीने नृत्य व सुस्वर गीत गायन केले.
विद्यार्थ्यांनी विविध कला आत्मसात कराव्यात त्यामध्ये पारंगत व्हावे म्हणून कागद काम, रांगोळी काढणे, मुखवटा बनविणे, फुले व फुलांची माळ बनविणे, मोदक बनविणे असे उपक्रम घेण्यात आले.
इ. ८ वी, ९वी, १०वी साठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षणात नैसर्गिक आणि घरगुती साहित्याचा वापर करून केमिकल विरहित साबण आणि उटणे बनविणे हा उपक्रम मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांनी घेतला. अशाप्रकारे आनंददायी शनिवार अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित सर, महामात्र मा.डॉ. गोविंद कुलकर्णी सर, मा.श्री. राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्यपी.बी. कुलकर्णी सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.