बारामती - क्रीडा व युवकसेवा संचालनालय, पुणे येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू तालुका क्रीडा संकुल खेड येथे गुरुवार दि. ०५/०९/२०२४ रोजी झालेल्या शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हरीभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमधील १७ वर्ष वयोगटात चि. ओमकार किरण मिसाळ याने द्वितीय क्रमांक पटकावला तर चि. चैतन्य प्रदीप बिचकुले, कु.सीमा निम्बाराम चौधरी, कु. शर्वरी मंगेश कुंभार, कु. तेजस्विनी सिध्देश्वर जाधव या विद्यार्थीनींनी उत्तम कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच वरील सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली.या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक अमित गावडे सर यांनी मार्गदर्शन केले.
सदर क्रीडा स्पर्धेसाठी शाळा समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित सर, महामात्र मा.डॉ. गोविंद कुलकर्णी, मएसो क्रीडावर्धिनी शाळा समन्वयक शैलेश आपटे सर तसेच मएसो नियामक मंडळ सदस्य राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य.पी.बी. कुलकर्णी सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.