श्री श्रेत्र सिध्दटेक येथे गणेश जन्माेत्सव संपन्न
दाैंड तालुका प्रतिनिधी सुभाष कदम
श्री क्षेत्र सिध्दटेक येथे सिध्देश्वराच्या मंदिरात श्री गणेशाच्या जन्मात्सवाचे थाटामाटात आयाेजन भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थी निमित्ताने आयोजित श्रीगणेश जन्माेत्सवाच्या प्रसंगी सिध्दटेक येथील सिध्देश्वराच्या गाभा-याला फुलांची आरास आली हाेती.या प्रसंगी ह.भ.प.श्रीकृष्ण पुराेहित यांनी समर्थ रामदासांनी लिहिलेल्या अभंगावरती
श्री गणपती समर्थ | गणपती गणराज
धुंडिराज महाराज चिंतामणी मारेश्वर
याविण नाही काज || अाकार उकार
मकार •••
या अभंगावर आपल्या रसाळ वाणीने निरुपण करुन श्री गणेशाच्या जन्मा विषयीची अख्यायिका सांगून गणेश भक्तांची मने जिंकली.यावेळी सर्व गणेश भक्त श्री गणेशाच्या जन्म कथेच्या श्रवणामध्ये तल्लीन झाले हाेते.
सिध्दटेक येथील सिध्देश्वराच्या मंदिरात भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या निमित्ताने पहाटेपासूनच धार्मिक विधी चालू झाले हाेते.परिसरातील भजणीमंडळांच्या गायनाने परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला हाेता. पुणे,अहिल्यानगर,साेलापूर या जिल्ह्यातील हजाराे गणेश भक्ताभक्तांनी माेठी गर्दी केली होती.
विशेष उपस्थिती म्हणजे कर्जत- जामखेडचे लाेकप्रिय आमदार मा.राेहिद दादा पवार यांनी सकाळी ७ वाजताच सिध्देश्वराचे दर्शन घेऊन आपली उपस्थिती दाखवली.
श्री गणेश जन्माेत्सवानंतर गणेशाची आरती करुन सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.