सो
सोमेश्वरनगर- महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बारामती तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मु.सा काकडे महाविद्यालयाने(१९वर्ष वयोगट मुले)प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली .यशस्वी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, ,महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे, महाविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य प्रा.सुजाता भोईटे,उपप्राचार्य प्रा.जयश्री सणस, पर्यवेक्षक गोलांदे आर.बी यांनी अभिनंदन केले. पुढील पुणे येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी खेळाडू विद्यार्थी खालील प्रमाणे:-
बोडरे ओम लक्ष्मण
गोरे प्रेमराज बबन
शिंदे कार्तिक राजेंद्र
जाधव शिवंभू जगदीश
शिंदे प्रथमेश दीपक
पवार हरी रविंद्र
बोडरे प्रणव माणिक
महनवर प्रशांत भिवा
पवार ओम रविंद्र
बरडे वेदांत उमेश
तांबे ओंकार नवनाथ
खोमणे आयुष युवराज
गोंडे साहील दादासो
शिंदे सोहम प्रभाकर
यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांना व संघाला प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप, यांनी मार्गदर्शन केले.