गौरी गणपती उत्सवनिमित्त घोलप कुटुंबियांनी देखाव्यातून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच विविध योजनांची जनजागृती.
घोलप कुटुंबीय दरवर्षी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करतात.
फोटो ओळ -गौरी गणपती उत्सव देखावा दाखवताना घोलप कुटुंबीय.
सोमेश्वनगर -गौरी गणपती उत्सव निमित्त विविध उपक्रमांतर्गत नवनवीन संकल्पना आकर्षक देखाव्यांच्या स्वरुपात शहरी तसेच ग्रामीण भागात आपल्याला पहायला मिळतात. अश्याच प्रकारचा एक जनहितार्थ उपक्रम बारामती तालुक्यातील करंजेपुल गायकवाड वस्ती येथील 'घोलप' कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हाती घेतला आहे. शासकीय योजनांचा प्रचार - प्रसार करणे तसेच गरजू नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून हा अनोखा उपक्रम गौरी गणपती हळदीकुंकू प्रसंगी सादर केल्या असल्याची माहिती सौ. काजल घोलप हिने दिली.
ग्रामीण भागातील शेतमजूर व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांसाठी गौरी गणपती हा उत्सव मोठा उत्सव मानला जातो या अनुषंगाने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण"तसेच सरकार मार्फत असणाऱ्या महिलांसाठी विविध योजनेच्या प्रचारासाठी गौरी मूर्ती समवेत देखावास्वरुप विविध आकारांचे मोठमोठे फलक लावण्यात आले होते .याठिकाणी अनेक महिला भगिनी कुटुंबासमवेत हळदी कुंकू व दर्शनासाठी येतात. त्यांना दर्शनासोबतच या योजनेचीही माहिती मिळावी.
या अशा उपक्रमांमुळे सरकारी योजनांबद्दल जनमानसांत जागृती निर्माण करण्यास मदत होते. यासाठीच घोलप कुटुंबातील सर्वच सदस्यांच्या सहकार्याने खूप मेहनत घेतली.
घोलप कुटुंबियांच्या गौरी गणपती देखाव्याची खूप चर्चा सोमेश्वर पंचक्रोशीतून कौतुक होत आहे