सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील करंजेपूल ग्रामपंचायत हद्दीत वाढत्या रोगराईला आळा घालण्यासाठी औषध फवारणी सुरुवात करण्यात आली , सोमेश्वरनगर करंजेपुल परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात लोक वस्तीत वाढ होत आहे.
सर्वत्रच यावर्षी समाधान कारक पाऊस व सध्या सतत पावसामुळे विविध प्रकारचे गवत उगवली असून कचरा, सांडपाणी आणि हवामानातील सततच्या बदलामुळे सर्वत्र साथीचे रोग आजाराने डोके वर काढले आहे.अंगदुखी, सर्दी, खोकला, ताप, डेंगू, चिकनगुनिया तसेच पावसाने उगवलेल्या विविध प्रकारच्या गवताने व तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेकांना आजाराला बळी पडावे लागत आहे यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करंजेपुल ग्रामपंचायत यांच्याकडून औषध फवारणी राबवण्यात येत आहे
ग्रामपंचायत करंजपूल गावाचे लोकनियुक्त सरपंच पूजा वैभव गायकवाड, उपसरपंच प्रवीण अरविंद गायकवाड व सर्व सदस्य ग्रामसेविका सुजाता आगवणे, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत शेंडकर, योगेश गायकवाड, लक्ष्मण लकडे, आबा गायकवाड यांच्या सहकार्यातून होत आहे.