Type Here to Get Search Results !

आज गौरी पूजनाचा दिवस; गौराई पूजनाची कथा आणि पद्धत नेमकी काय? जाणून घ्या सविस्तर .

आज गौरी पूजनाचा दिवस; गौराई पूजनाची कथा आणि पद्धत नेमकी काय? जाणून घ्या सविस्तर
विशेष प्रतिनिधी ----अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय गणरायाचे आगमन क्षणभर दि ७ झाले असून  घरोघरी मोठ्या उत्साहात गौराई पूजना मंगळवारी 10 सप्टेंबरला गौरा आवाहनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज  बुधवार 11 सप्टेंबरला गौरी पूजन केलं जातं. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन केलं जातं. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी(Gauri) हे व्रत करतात. गौरी पूजनला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असंही म्हणतात. गौरी किंवा महालक्ष्मीचं पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केलं जातं, म्हणूनच याला ज्येष्ठागौरी असंही म्हटलं जातं. 

ज्येष्ठा गौरीचं व्रत-गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला.  तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरीपूजनला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असंही म्हणतात. गौराईचं पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केलं जातं, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असंही म्हणतात. 

माहेरवाशीण गौराईसाठी नेवेद्याचा बेत...गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गौराईचं स्वागत केलं जातं. गौराईचं अगदी माहेरवाशीणीसारखं स्वागत केलं जातं.... घरोघरी गौरीचं आगमन झालं आहे. माहेरवाशीण गौराईसाठी गोडाधोडाचा बेत करुन तिचा पाहुणचार केला जातो, यालाच गौरी पूजन असे म्हणतात. गौराईला महानैवेद्य दाखवितात. तिच्यासाठी खास गोडाधोडाचं जेवण केलं जातं. यामध्ये एक दिवस भाजी भाकरी दुसऱ्या दिवशी गोडाधोडाचा निवेद पुरणपोळी पाच कोशिंबीर तसेच विविध प्रकारचे भाज्या असे पंचपक्वान्न असा बेत केला जातो. नेहमीप्रमाणे महालक्ष्मीची पूजा करून चांगला नैवेद्य दाखवून तो आपण प्रसाद म्हणून घ्यायचा असतो. सर्वत्र ठिकाणी गौराईला गोड नैवेद्य नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. माहेरवाशींन सुख देत त्या तिसऱ्या दिवशी गौराई पूजनानंतर मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं. आणि त्या दिवशी त्यांचे मुखवटे नाराज स्वरूपात दिसत असतात.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test