उपमुख्यंत्री अजित पवार यांनी करंजेपूल येथील कैलास मगर यांना वाहिली भावपूर्ण आदरांजली.
सोमेश्वरनगर-बारामती तालुक्यातील करंजेपूल येथील कैलास प्रल्हाद मगर यांचे निधन झाले असता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील सोमेश्वरनगर करंजेपुल येथे त्यांच्या घरी भेट देऊन कै. कैलास मगर यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली तसेच अनुयायांची भेट घेऊन सांत्वन केले.
कैलासराव हे माझ्या अगदी जवळचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते मला आठवतंय त्यांची नेहमीच रोखठोक भूमिका हसतमुख बोलके स्वभावाचे त्यांनी अनेक विविध विकास कामांसाठी माझ्याकडे हक्कानी येत व काम मार्गी लावत असा त्यांचा स्वभाव .. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आदरांजली वाहिली.