सोमेश्वरनगर - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय ; सोमेश्वर पंचक्रोशीत नेहमीच विविध सामाजिक विकास कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे ; मिश्किल स्वभाव व हसरे व्यक्तिमत्व अशी ओळख ; करंजे वि.का. सोसायटीचे माजी चेअरमन तसेच सोमेश्वर ट्रक ट्रॅक्टर वाहतुक संघटना संचालक करंजेपुल (ता बारामती) येथील कैलास प्रल्हाद मगर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते ६० वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित भाऊ शरद मगर , दोन मुले पुतणे सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर दिग्विजय मगर व योगीराज मगर यांचे वडील तसेच श्री सोमेश्वर साखर कारखाना कामगार पतसंस्था माजी चेअरमन विशाल मगर व उद्योजक गणेश मगर यांचे ते चुलते होत.