लाखो शिवभक्तांनी घेतले करंजेतील "सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग" दर्शन.
श्रींच्या पालखी सोहळ्याप्रसंगी पायघड्या आयोजन करताना ननवरे कुटुंबीय.
सोमेश्वरनगर - श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार म्हणजे श्रावण मास श्रावणी यात्रा ... सोमवायच्या करंजे व पंचक्रोशीतील ही यात्रा शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाचे असते. करंजे सह सोमेश्वर पंचक्रोशीतील सर्वच पै पाहुणे तसेच विविध जिल्ह्यातूनच नव्हे तर पर राज्यातूनही शिवभक्त भाविक येथे स्वयंभू शिवलिंग दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने येत असतात.सौराष्ट्रातील प्रति रूप मानले जाणारे बारामती तालुक्यातील करंजे येथील प्रसिद्ध श्रीक्षेत्र सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग दर्शन दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी लाभ घेतला. श्रावणातील शेवटच्या सोमवार व सोमवारीच असलेली अमावस्या निमित्त रात्री पासूनच शिवभक्तांनी रांगा लावून दर्शनाचा लाभ घेतला. सोमवारी सोमवती अमावस्या असल्याने पहाटेच श्रींची मूर्ती निरा नदी स्नान करून निरा ,निंबुत वाघळवाडी, करंजेपुल मर्गे करंजे गावातून पहाटेच पाच वाजता सोमेश्वर मंदिराकडे प्रस्थान झाली यावेळी करंजे मध्ये येताच करंजे ग्रामस्थांनी स्वागत केले तसेच गावातील ननवरे कुटुंबियांनी पालखीचे स्वागत पायघड्या टाकत केले पालखी सोहळा सोमेश्वर मंदिराकडे प्रस्थान . मध्यरात्री १२ वाजता महापूजा खासदार सुनेत्र पवार, युवा नेते पार्थ अजित पवार, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संचालक राजवर्धन शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, संचालक ऋषिकेश गायकवाड, रमाकांत गायकवाड, करंजेचे सरपंच भाऊसो हुंबरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत मोकाशी, सचिव विपुल भांडवलकर, समस्त विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते महापूजा पार पडली यावेळी सोमेश्वर पंचक्रोशीतील पदाधिकारी व शिवभक्त मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते . सकाळी नऊ वाजता श्रींचा आरती सोहळा व पालखीपूजन पार पडल्यानंतर श्रावणातील या सोहळ्याचे खोमणे भेटीसाठी प्रस्थान करण्यात आले. श्रींच्या या पालखी सोहळ्यास जळगाव कप, आंबवडे गावचे पारंपरिक मानकरी पवार, पाटील यांनी वाजतगाजत पालखी खोमणे स्थळ ठिकाणी नेण्यात आली. दरवर्षी येणाऱ्या शिवभक्त मध्ये मुंबईच्या कोळीबांधवांनी यावेळी आपल्या कलेला जपत सुंदर नृत्य करत पालखी सोहळ्यात त एक वेगळी रंगत आणली, वारकरी संप्रदायातील लहान थोरांनी टाळांच्या ठेका नृत्य केले , व्यावसायिक व करंजे ग्रामस्थांसह शिवभक्तांनी लाह्या बत्तेशीय तसेच गुलाबांची उधळण केली बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे व जळगाव,कप येथील खोमणे कुटुंबाला पालखी सोहळ्याचा मान देण्यात आला. यानंतर शाल पागोटा देत दुपारी बारा वाजता आरती पार पडल्यानंतर वाजतगाजत श्रींचा पालखी सोहळा सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत या सोहळ्याची सांगता झाली. श्रींचे दर्शन घेण्यासाठी लाखो शिवभक्तांनी एकच गर्दी केली होती.बारामती येथील मयूर बोबडे यांनी मंदिर परिसराला आकर्षक पुष्पसजावट केली होती.
पुनम ज्वेलर्स, के. एम. आळंदीकर सराफ पेढीचे प्रमुख किरण आळंदीकर व शुभम आळंदीकर यांचे वतीने आकर्षक फळांची आकर्षक सजावट केली होती. प्रमोदकुमार गीते, मुरूम येथील नामदेव शिंगटे, ट्रक-चालक मालक माल वाहतूक संघटना तसेच राजहंस पतसंस्थेच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद देण्यात आला. होळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांनी भाविकांसाठी मोफत औषधोपचाराची सोय केली होती. बारामती आगाराच्या वतीने यात्रा स्पेशलसाठी जादा गाड्यांची सोय करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे व त्यांच्या सहकार्यानी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासूनच पावसाने उघडी बसल्याने मंदिर व मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता खेळणी वाली मिठाई ग्रुप वस्तू पाळणे हॉटेल विविध स्वरूपात आलेले स्टॉल यांची अधिकची विक्री होणार असल्याने त्यांच्यामध्ये समाधान होते.