सोमेश्वरनगर येथील "मोरया प्रतिष्ठाण" सार्वजनिक गणेशोत्सव पहिल्याच वर्षी मोठ्या उत्साहात .
सोमेश्वरनगर(वार्ताहर): बारामतीतील सोमेश्वरनगर परिसरात साजरा होणारा गणेशोत्सव हा नेहमीच लक्षवेधी ठरत असतो. अनेक सामाजिक उपक्रम राबवत येथील सार्वजनिक गणेशोत्सव काळात मंडळे एक आदर्श निर्माण करतात.सर्वत्रच सार्वजनिक गणेशोत्सवाला देखील एक वेगळी परंपरा आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित करंजेपुल दूरक्षेत्र येथे सोमेश्वर परिसरातील सर्वच गणेश मंडळ तसेच पोलीस पाटील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार दिनांक ९ रोजी सामाजिक उपक्रम म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे मोठे आयोजन केले आहे .
सोमेश्वर पंचक्रोशीतील असलेल्या सर्वच गाव वाडी वस्तीमध्ये गणेश मंडळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सवात विधायक सामाजिक विविध उपक्रम.. शनिवार दि ७ पासून सुरू झालेल्या गणेशमूर्ती प्राण प्रतिष्ठापासून सकाळ संध्याकाळ रोजची आरती पूजा तसेच प्रसाद आयोजन.. महिलांसाठी विशेष मनोरंजन पर कार्यक्रम तर लहान मुलांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी विविध खेळ, मनोरंजन कार्यक्रम आयोजन असते . मोरया प्रतिष्ठाण ने पुरातन महादेव मंदिर शिल्प रचना असा सुंदर देखावा फ्लेक्स उभारला आहे. परिसरातील अनेक मंडळे खूप वर्षांपासून आहे सोमेश्वरनगर येथील मोरया प्रतिष्ठाण या मंडळाने गणेश उत्सवाचे पहिलेच वर्षी चांगले व नियोजनबद्ध आयोजन केले आहे... इथून पुढील काळात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवणार असून मोरया प्रतिष्ठाण या मंडळाचे नाव उंचावर नेते एक आदर्श निर्माण करणार असल्याचे मंडळातील पदाधिकारी सदस्य यांनी बोलताना सांगितले.