श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमत्त अन्नदान
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमवार दि २६ रोजी सायंकाळी श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे श्रावणी चौथा सोमवार व श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य अन्नदाना सोहळाचे आयोजन श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने सोमेश्वर मंदिर येथे करण्यात आले प्रसिद्ध श्री क्षेत्र स्वयंभू शिवलिंग दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तर संस्थेच्या कार्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .या आधी ही श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेने कोरोना काळात सोमेश्वर भाविक भक्तांना फळे व माक्स वाट करण्यात आले होती तसेच संस्थेच्या माध्यमातून विविध सोमेश्वर पंचक्रोशीत विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याची माहिती श्री सेवाभावी संस्थापक अध्यक्ष सुखदेव शिंदे यांनी दिली.